जातीवाचक शिवीगाळ, बांद्यातील तरुणावर गुन्हा दाखल…

1
2
Google search engine
Google search engine

बांदा:
जातीवाचक शिवीगाळ व मारहाणीची धमकी दिल्या प्रकरणी बांदा – निमजगा येथील तुषार भरत मांजरेकर (२३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवेक राजू बांदेकर (३२, रा. बांदा बांदेकरवाडी) यांनी बांदा पोलीसात फिर्याद दिली होती. त्यानुसार संशयित तुषार मांजरेकर याच्या विरोधात अनुसुचित जाती जमाती अत्याचार अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (आर) (एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा तपास प्रकरणी सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी बांदा येथे दाखल झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्याकडून त्यांनी सर्व माहिती घेतली. संशयिताला शुक्रवारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती बांदा पोलीसांनी दिली.