खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…

3
2
Google search engine
Google search engine

कांदळगावात हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत लघुरुद्र, आरती…

मालवण,ता.१५: खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस आज तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. खासदार राऊत यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, यासाठी सकाळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात लघुरुद्र आणि आरती करण्यात आली.

यावेळी छोटू ठाकूर, राजेश गावकर, किरण वाळके, सुहास पेडणेकर, मसुरे सरपंच संदीप हडकर, पराग खोत, माजी विभागप्रमुख अमोल वस्त, उपविभागप्रमुख विजय पालव, विभाग प्रमुख अमोल परब, दीपक परब, कांदळगाव माजी सरपंच रणजित परब, शशांक माने, युवासेना पदाधिकारी राहुल सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.