सावंतवाडीत “मोफत ई-श्रम कार्ड व युनिव्हर्सल पासचे वाटप…

2
2
Google search engine
Google search engine

राष्ट्रवादीचा पुढाकार;भोसले व सामंत यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ…

सावंतवाडी,ता.१९: राष्ट्रवादीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या “मोफत ई श्रम कार्ड नोंदणी आणि युनिव्हर्सल पास” चा शुभारंभ आज माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी २७ मार्च पर्यंत ही सेवा शहरातील नागरिकांचीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा अर्चना घारे यांनी केले आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रविण भोसले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक,शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, अफरोज राजगुरू, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, पुजा दळवी, सत्यजित धारणकर, इफतेकार राजगुरू ,कौस्तुभ नाईक,अर्षद बेग,फैयाज शेख आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.