नितेश राणे, गोट्या सावंत यांचे कणकवलीत भाजपा पदाधिकाऱ्यांमार्फत स्वागत…

2
2
Google search engine
Google search engine

 

कणकवली, ता.१९ : प्रवेशबंदी उठल्‍यानंतर कणकवलीत दाखल झालेले आमदार नितेश राणे आणि जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे आज कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तसेच राणेंच्या स्वागताचे फलकही शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी असलेले आमदार नितेश राणे आणि जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जिल्‍हा न्यायालयाने दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुका बंदी घातली होती. कणकवली पोलिसांनी हल्‍ला प्रकरणी १६ मार्च राेजी कणकवली न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. यानंतर राणेंचा कणकवली प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता.
आज आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत हे कणकवलीत दाखल झाले. यावेळी कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर ते दाखल होताच त्यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांमार्फत स्वागत करण्यात आले. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे तसेच इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.