सावंतवाडी भंडारी समाज मंडळाचा १५ एप्रिलला वधु-वर मेळावा…

8
2
Google search engine
Google search engine

जगदीश मांजरेकर; सहभागी होण्याचे समाज बांधवांना आवाहन…

सावंतवाडी,ता.२०: तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने १५ एप्रिलला वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या नवरंग कलामंच हॉलमध्ये स. १०:०० ते सायं. ४:०० या वेळेत होणार आहे. यावेळी भंडारी समाजातील जास्तीत-जास्त वधू-वरांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांनी केले आहे.

येथील भंडारी समाज मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. या मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मंडळाचा पहिला उपक्रम म्हणून वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा १५ एप्रिलला स. १०:०० ते सायं. ४:०० या वेळेत होणार आहे. तरी जास्तीत जास्त भंडारी समाजातील वधू-वरांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, तसेच अधिक माहितीसाठी सावंतवाडी भंडारी भवन कार्यालयात किंवा ०२३६३/ २७४७७१ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने श्री.मांजरेकर यांनी केले आहे.