कणकवली बाजारपेठेतील मांडावर ‘हास्यकल्लोळ’ स्पर्धा…!

3
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.२१: शिमगोत्सव हा कोकणातील पारंपरिक लोककलांचा उत्सव आहे.या उत्सवाच्या औचित्यसाधून महापुरूष मित्रमंडळाच्यावतीने २९ ते ३० मार्च या कालावधीत झेंडा चौक येथील मांडावर रात्री ९ वा. पासून मांडावरील हास्यकल्लोळ ‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या वर्षीचे हे चौथे वर्ष असून शिमगोत्सवातील प्रहसन विडंबन,विनोदी नाटकातील प्रसंग,स्वरचीत विनोदी प्रसंग,निखळ मनोरंजन करणारे विनोदी प्रसंग,घुमटवादन या थिमवर ही स्पर्धा रंगणार आहे.या उत्सवात जिल्ह्यातील कलाकारांनी, गावागावातील शिमगोत्सव संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापुरूष मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिमगोत्सवातील या स्पर्धेसाठी प्रथम विजेत्याला १०,००० रु.व चषक,द्वितीय विजेत्याला ८,००० रु व चषक,तृतीय क्रमांक विजेत्याला ६,००० रु व चषक अशी पारितोषिक दिली जाणार आहेत . या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी २६ मार्चपर्यंत महापुरुष मित्रमंडळाकडे संपर्क करून नावनोंदणी करावयाची आहे.तसेच स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रद्युम मुंज- ( ९५४५१२१६१६ ) प्रज्वल – वर्दम ( ७५८८८ ९९ ६०० ) यांच्याकडे संपर्क साधावा.

सोशल मिडिया आणि मनोरंजनाची आधुनिक साधने यामुळे पारंपरिक लोककला विस्मृतीत जात आहेत.या लोककलांना पुन्हा लोकाश्रय मिळवून देवून या कलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हास्यकल्लोळ या सारख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या कलांचा आविष्कार पुन्हा एकदा कणकवलीकरांना पहावयास मिळणार आहे.