कृषि सहाय्यक संघटनेच्या सहकोषाध्यक्ष पदी सुषमा देसाई…

2
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२२: कृषि सहाय्यक संघटना सिंधुदुर्गच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन सन्मान राखत सिंधुदुर्गच्या राज्य कार्यकारीणी सदस्या सुषमा देसाई यांची सहकोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेची राज्यस्तरीय त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रीया रविवारी शिर्डी येथील हाॅटेल साई गोल्ड मध्ये पार पडली. राज्य निवडणुक अधिकारी म्हणून नारायण घुले हे यांनी काम पाहीले. कार्यकारीत १८ सदस्यांची कार्यकारणी यावेळी जाहिर करण्यात आली.

या निवडी बाबत सौ. देसाई यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.