बांदा केंद्रशाळेत पुस्तकांची गुढी उभारून नववर्षाचे स्वागत…

3
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०२: भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्यातील पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. हा दिवस उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेत पुस्तकांची गुढी उभारून ‘वाचाल तर वाचाल’ असा अनोखा संदेश देत नववर्षाचे स्वागत करून साजरा करण्यात आला.

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना भारतीय सण,उत्सव व परंपरांची ओळख व्हावी यासाठी बांदा केंद्रशाळेत विविध प्रकारचे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत.

भारतीय संस्कृतीत चैत्र महिन्यातील पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्यानिमित्ताने नवीन वस्तू खरेदी करणे,नवीन व्यवसाय चालू करणे,सुवर्ण खरेदी कली जाते.या दिवशी दारी उभारण्यात आलेली गुढी हे विजय आणि समृध्दीचे प्रतीक असून याची परंपरा प्राचीन युगापासून सुरू आहे.

बांदा नं .१ केंद्रशाळेत शिक्षणाचे महत्व सयजावून देत असलेल्या पुस्तक गढीची उभारणी करण्यात आली.या उभारलेल्या पुस्तक गुढीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर , केंद्रप्रमुख संदीप गवस ,उपशिक्षक जे.डी.पाटील,रंगनाथ परब, प्रशांत पवार,सरोज नाईक,रसिका मालवणकर ,उर्मिला मोर्ये,लुईजा गोन्सलवीस ,शुभेच्छा सावंत ,जागृती धुरी,वंदना शितोळे,शीतल गवस यांनी परिश्रम घेतले.