बावशी येथील महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद…

4
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.०३: गुढीपाडव्याचा उत्साह सगळीकडेच ओसंडून वाहत असतो. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बावशी गावी महिलांच्या पुढाकाराने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बावशी गाव हा लोकसंख्येने छोटा गाव असला तरी या गावातील महिला विविध सांस्कृतिक उपक्रम राबवीत असतात. फुगडी महिलांचं भजन हे सांगीतिक कार्यक्रम होत असतात.यावर्षी गुढीपाडव्याला गावातील बहुसंख्य महिलांनी एकत्र येत या गावच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि बवशी शिवसेना महिला शाखाप्रमुख सुप्रिया खडपे यांच्या पुढाकारातून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यात प्रामुख्याने नाच-गाणी, समूहगीत असे कार्यक्रम सादर करण्यात आले.

खेडेगावातील महिला या कष्टकरी महिला असतात. त्यांना आपले कलागुण विकसित करायला आणि ते मंचावर सादर करायला संधी मिळत नाही. परंतु गुढीपाडव्या सारख्या सणादिवशी गावातील सगळ्या महिला एकत्र येऊन जेव्हा असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात तेव्हा त्यांना प्रेरणाच मिळते.त्यामुळे यापुढेही दरवर्षी असा कार्यक्रम महिलांचा आयोजित केला जाणार असल्याचे यावेळी बोलताना सुप्रिया खडपे यांनी सांगितले.