आयनल सोसायटीवर शिवसेना पॅनेलचा झेंडा…

4
2
Google search engine
Google search engine

सर्व १२ जागांवर विजय ; सतीश सावंत, सुशांत नाईक यांच्याकडून संचालकांचे अभिनंदन…

कणकवली,ता.०४: तालुक्‍यातील आयनल विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत सर्व १२ जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. सर्व विजयी संचालकांचे अभिनंदन शिवसेना नेते सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक तथा नगरसेवक सुशांत नाईक यांनी यांनी केले.

रविवारी आयनल सेवा सोसायटीसाठी मतदान आणि निकाल जाहीर झाला. यात शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधून रावजी सोनु चिंदरकर (७३ मते), उत्तम ओटवकर (६८ मते) मनोहर चव्हाण (७२ मते), सुशांत चव्हाण (७१ मते), सुरेश मुंगेकर (७१ मते), विष्णू हडकर (७३ मते), अरविंद ओटवकर (६७ मते), भास्कर लोके (७२ मते), हे सर्वसाधारण कर्जदार गटातून विजयी झाले. महिला प्रतिनिधी गटातून संगीता धनाजी चव्हाण (७४ मते), सौ. संगीता सूर्बा चव्हाण (७३ मते), विजयी झाल्या. इतर मागास प्रवर्गातून सुधीर देऊ लाड (७३ मते), अनुसूचित जाती जमाती गटातून प्रकाश सावळाराम सावध सर्वाधिक ७७ मते घेऊन विजयी झाले आहेत