चौकुळ-सातीवन परिसरात वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार…

2
2
Google search engine
Google search engine

नुकसान भरपाई द्या; भाजप तालुकाध्यक्ष गजानन पालेकरांची मागणी…

आंबोली,ता.०५: सह्याद्री पट्ट्यात फिरणार्‍या वाघाने चौकुळ सातिवन परिसरातील सुभाष नाईक यांच्या म्हैशीवर हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना चार दिवसांपूर्वी घडली. दरम्यान संबंधित शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आंबोली मंडळ भाजप प्रभारी तालुकाध्यक्ष गजानन पालेकर यांनी केली आहे.