ठेकेदाराचा सुशेगादपणा सावंतवाडीच्या संस्थानकालीन पर्णकुटी विश्रामगृहाला भोवणार…?

4
2
Google search engine
Google search engine

बांधकाम अधिकार्‍यांचा दुर्लक्ष; छप्पर काढुन टाकल्याने अवकाळीत भिंती कोसळण्याची शक्यता…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.०७: ठेकेदार सुशेगाद काम करीत असल्यामुळे सावंतवाडीतील पर्णकुटी विश्रामगृहाच्या मातीच्या भिंती अवकाळी पावसाच्या पाण्यात फुगण्याची भिती आहे. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहेत. विश्रामगृहाच्या नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी छप्पर काढुन टाकण्यात आले आहे. परंतु पाऊस जास्त झाल्यास मातीच्या भिंती फुगून कोसळण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक नागरीकांनी ठेकेदार आणि बांधकाम अधिकार्‍यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सर्व राजकीय तसेच अनेक क्षेत्रातील लोकांच्या पसंतीस उतरणारे सावंतवाडी शहरात असलेल्या संस्थानकालीन पर्णकुटी विश्रामगृहाचे नुतनीकरणाचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर इमारतीवरील छप्पर पुर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. मात्र अचानक दोन दिवस दाखल झालेल्या अवकाळी पावसामुळे त्या इमारतीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबतची माहिती परिसरातील काही नागरीकांकडुन देण्यात आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही इमारत संस्थानकालीन बनावटीची असून मातीची आहे. त्यामुळे पावसाळ्यात भिंती फुगून धोकादायक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान याबाबत लक्ष वेधण्यासाठी बांधकामच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी संबधित ठेकेदाराला लवकरात लवकर काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असे सांगून अधिक बोलणे टाळले.