कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालय नजीक सेल्फी पॉइंट; नितेश राणेंच्या हस्ते आज शुभारंभ….

2
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.०९: येथील नगरपंचायतच्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालय नजीकच्या जागेत “सेल्फी पॉइंट” उभारण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज रात्री ८ वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. युवाईला आकर्षण असलेला हा सेल्फी पॉइंट आजपासून कणकवलीतील तरुण-तरुणींच्या सेवेत दाखल होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.