हळवल येथे उद्या रामनवमी उत्सव…

2
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.०९: श्रीराम सेवा मंडळ हळवल (मुंबई) यांच्या वतीने येथील श्री राम मंदिरात उद्या १० एप्रिलला रामनवमी उत्सव साजरा होणार आहे.

दरम्यान २ एप्रिल गुढीपाडव्यापासून ९ एप्रिलपर्यंत भव्य कीर्तन उत्सव साजरा केला जात आहे. कणकवली तालुक्यातील नामवंत कीर्तनकार या कीर्तन उत्सवात सुश्राव्य कीर्तन सादर करत आहेत. तर रविवार १० एप्रिल रोजी श्री. रामनवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त स. ८.३० वा. श्रीराम षोडशोपचार पूजा, स. ९ वा. उत्सवाचे ग्रामदेवतेला आमंत्रण, स. १० वा. श्रीराम जन्माचे कीर्तन, दु. १२ वा. श्रीराम जन्म सोहळा, दर्शन व तीर्थप्रसाद, दु. १ वा. श्रीराम पालखी प्रदक्षिणा, दु. १.३० महाप्रसाद, सायं ६.३० ते ७. ३० वा. हरिपाठ, रात्री ८ ते ९ वा. भजन, रात्री ९ वा. श्रीराम पालखी प्रदक्षिणा, रात्री ११ वा. कीर्तन, रात्री १२ वाजता नाट्यप्रयोग होणार आहे.