“त्या” चौघा संशयितांना ताब्यात घेण्यास पोलिसांना अपयश…

2
2
Google search engine
Google search engine

 

विनयभंग व मारहाण प्रकरण;शोध सुरू, सावंतवाडी पोलिसांचे म्हणणे

सावंतवाडी ता.१९: विवाहीत महिलेची छेडछाड करुन तिला व तिच्या पतीला बेदम मारहाण करत विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या “त्या” चौघाही संशयितांना ताब्यात घेण्यास सावंतवाडी पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान ते फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपासी अंमलदार तौसिफ सय्यद यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात राहणाऱ्या महिलेला व तिच्या नवर्‍याला मारहाण केल्याप्रकरणी संबधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसा चौघा विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नासिर शेख, संतोष ऊर्फ गणप्या झेमणे, विशाल सावंत, बाबू झेमणे (सर्व रा.गरड) अशी संशयित आरोपीची नावे आहेत. संबंधित विवाहिता शहरातील एका दुकानात कामाला जाते. ती रात्री काम आटपून पतीसह घरी जात असतांना १६ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. मारहाणीत महीला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून तिला अधिक उपचाराकरता जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. एकूणच गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांच्या घराची तसेच परिसराची झडती घेण्यात आली. मात्र अद्यापही पोलिसांना ते सापडून आले नाहीत. तर संशयित अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचेही समजते.