गोवेरी येथे बुवा चिंतामणी पांचाळ शिष्य परीवाराचा “स्वर चिंतामणी” कार्यक्रम उत्साहात…

2
2
Google search engine
Google search engine

रसिक मंत्रमुग्ध; पांचाळ यांनी स्वरबद्ध केलेल्या अंभग-गौळणींचे दिमाखदार सादरीकरण…

कुडाळ,ता.१०: बुवा कै. चिंतामणी पांचाळ शिष्य परीवाराच्या वतीने आयोजित “स्वर चिंतामणी” हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी श्री. पांचाळ यांनी स्वर बद्ध केलेल्या अंभग-गौळणींच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. गोवेरी येथील श्री. देव सत्पुरुष सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन चिंतामणी बुवा पांचाळ यांचे शिष्य हनुमंत घाडीगावकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी देवस्थान मानकरी विठ्ठल गावडे, गोविंद गावडे , मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे , संजय गावडे, सतिश गावडे, महेश गावडे , बुवा योगेश पांचाळ, गणेश गावडे , मयुर पिंगुळकर, अनिल गोसावी, संतोष नांदोस्कर, अजित गोसावी, अनिल पांचाळ, आनंद मोर्ये, प्रसार मेस्त्री आदी उपस्थीत होते.

कार्यक्रमाची सुरवातीला कै . चिंतामणी बुवा यांचाळ, कै. प्रमोद सुतार बुवा , कै. परशुराम पांचाळ बुवा, कै. सतिश राणे बुवा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी चिंतामणी बुवा पांचाळ यांचे शिष्य – श्री हनुमंत घाडीगावकर , श्री दयानंद राणे , श्री गणेश गावडे, श्री बाबा ठाकर, विठ्ठल गावडे , श्री. गाविंद गावडे, श्री. संतोष नांदोस्कर, श्री. अमित गोसावी, श्री अनिल पांचाळ, श्री. आनंद मोर्ये, प्रसाद मेस्त्री, श्री. निलेश पेडणेकर, श्री अमेय परब , श्री. अजित गोसावी, श्री. मयुर पिंगुळकर यांचा श्री. योगेश पांचाळ बुवा यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर बहारदार अभंग-गौळणीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन पखवाज विशारद निलेश पेडणेकर यांनी केले.