निरोगी आरोग्यासाठी माधवबागची “बस्ती पंचकर्म चिकित्सा” आता फक्त ५९९ रुपयात…

5
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०१: निरोगी आरोग्यासाठी माधवबागच्या बस्ती पंचकर्म चिकित्सेवर खास ऑफर्स ठेवण्यात आली आहे. वर्षा ऋतू निमित्त ८५० रुपयांची ही चिकित्सा फक्त ५९९ रुपयांमध्ये केली जाणार आहे. यात प्रत्येकी ५९९ प्रमाणे ५ ते १० चिकित्सा करून घेता येणार आहेत. ही सुविधा कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या तिन्ही शाखात उपलब्ध होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन माधवबागच्या वतीने करण्यात आले आहे.

बस्ती चिकित्सा ही उपचार पद्धती वात दोष आढळल्याने होणारे भिन्न आजार संधिवात ,पक्षवध (लकवा) पोट साफ न होणे ,पोट फुगल्यासारखे वाटणे ,अंग दुखणे जडपणा ,स्थूलपणा, भूक न लागणे मूत्र निर्मितीशी संलग्न काही आजार, मणक्याचे विकार, सांधेदुखी, कंबर दुखी ,मानेचे विकार आदी रोगांवर फायदेशीर ठरते. ही चिकित्सा १ ते 30 जून या कालावधीत करून घेतल्यास वर्षा ऋतु ऑफरचा रुग्णांना लाभ घेता येणार आहे. ही सेवा कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या तिन्ही शाखांमध्ये उपलब्ध असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी कुडाळ-9011328581, कणकवली-9373183888 (सोमवार बंद) सावंतवाडी-7774028185 (सोमवार बंद) या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन माधवबाग टीमकडून करण्यात आले आहे.