मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना “शिवार बैठकांच्या” माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा… 

2
2
Google search engine
Google search engine

शैलेंद्र दळवी; वेंगुर्लेत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन…

वेंगुर्ले,ता.०१: मोदी सरकारने सत्तेवर आल्या-आल्या विविध कल्याणकारी योजनांचा झपाट्याने प्रारंभ केला. या योजना प्रामुख्याने गोर-गरीब, महिला, मध्यम वर्ग, छोटे शेतकरी, कामगार, मजुर, कष्टकरी या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या. या योजनांचे लाभ थेट गरजु वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी मोदी सरकारने थेट हस्तांतरण ( डीबीटी ) प्रक्रिया पद्धतशीरपणे कार्यान्वयीत केली. त्यामुळे थेट लाभाच्या योजनेचा पैसा गोरगरिबांच्या खात्यात जमा झाला. अशा योजनांचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शिवार बैठकांच्या माध्यमातून किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भाजपाचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे संघटन मंत्री शैलेंद्र दळवी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली असून या आठ वर्षांत देशातील शेतकरी वर्गासाठी अनेक योजना सुरू केल्या, म्हणूनच केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० ठिकाणी शिवार बैठकांचे आयोजन किसान मोर्चा च्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकांचा शुभारंभ वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावामध्ये आंबा बागेत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान नीधी, पिक विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड, किसान रेल, शेतकरी उत्पादक संघटना ( एफ.पी.ओ.), मृदा आरोग्य कार्ड, सौर सुजला, ग्राम सिंचाई ई- नाम, किसान सुविधा अॅप इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली.

दरम्यान यावेळी किसान मोर्चा – सिंधुदुर्ग च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अभिनंदनाचा ठराव शिवार बैठकीत घेण्यात आला. यावेळी संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकारी यांचे कौतुक करुन पी.एम.किसान सन्मान योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवीणयाचे आवाहन केले. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते किसान मोर्चाचे जिल्ह्याचे संयोजक उमेश सावंत यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस व कीसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना देसाई, किसान मोर्चाचे सल्लागार रामकृष्ण उर्फ बाळा सावंत, सरचिटणीस गुरुनाथ पाटील व बाळु प्रभु, महिला जिल्हा संयोजीका दिपा काळे, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ केळुसकर, जिल्हा चिटनीस अजय सावंत, मालवण मंडल अध्यक्ष महेश श्रीकृष्ण सारंग, ओरस मंडल अध्यक्ष सूर्यकांत नाईक , वेंगुर्ले ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर , ता.का.का.सदस्य सुनील घाग , प्रगतशील शेतकरी प्रकाश झेंडे , शेतकरी मित्र महादेव नाईक , पोल्ट्री व्यवसायीक सत्यवान पालव , महेश मेस्त्री , महेश सावंत , शैलेश जामदार , सौरभ नाईक , मानसी मेस्त्री इत्यादी कीसान मोर्चा पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.