मळगावात “ड्रीम कलेक्शन”चे युवराज लखमराजेंच्या हस्ते दिमाखात उद्घाटन…

7
2
Google search engine
Google search engine

राज सोनुर्लेकरांचा पुढाकार;३ टी-शर्ट किंवा ३ शर्ट फक्त १ हजारात मिळणार…

सावंतवाडी,ता.०४: सोनूर्ली येथील युवा उद्योजक राज सोनुर्लेकर यांच्या माध्यमातून मळगाव येथे सुरू करण्यात आलेल्या “ड्रीम कलेक्शन” या कपड्याच्या दालनाचा शुभारंभ आज सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे मालवणी समालोचक बादल चौधरी उपस्थित होते. या दालनात “जेन्ट्स” कपडे उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी ब्रँडेड कंपनीची ३ टी-शर्ट किंवा ३ शर्ट फक्त १ हजार रुपयात खरेदी करता येणार आहेत.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते डी.के सावंत,निरवडे माजी सरपंच प्रमोद गावडे,माजी पंचायत समिती सदस्या अन्नपुर्णा सोनुर्लेकर,जीजी राउळ,सतिश सोनुर्लेकर,जिग्नेश सोनुर्लेकर,वरुण सोनुर्लेकर,दिनेश सोनुर्लेकर,अभिषेक सोनुर्लेकर,साक्षी सोनुर्लेकर,प्राची आसोलकर,सुनिता बांबर्डेकर,मिथील खोबरेकर,मैथाली खोबरेकर,तुषार शिर्के,चद्रशेखर बांबर्डेकर,दक्षता आमडोसकर,रामदास नाईक,रंजन केणी,दाजी नाईक,अंकुश बांबर्डेकर,रमेश गावकर,सुजय गावकर,प्रकाश गावकर,संजय सोनुर्लेकर,आनंद गावकर,विकास गावकर,अमोल गावकर,सनीश सोनुर्लेकर,कुलदीप मळगावकर,चंद्रकला सोनुर्लेकर,उर्मिला सोनुर्लेकर,संदिप नाविक,लोकेश पिले आदी उपस्थित होते.

दरम्यान उद्घाटनाच्या निमित्ताने खास ग्राहकांसाठी ब्रँडेड कंपनीची ३ टी-शर्ट किंवा ३ शर्ट फक्त १ हजार रुपयात खरेदी करता येणार आहेत.या दालनात जेन्ट्ससाठीचे ब्रॅण्डेड कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात जीन्स पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट, हाफ पॅन्ट, शर्ट , टी-शर्ट तसेच अंडर गारमेंटचा समावेश आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.सोनुर्लेकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.