Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमी निर्णय; २९ तारखेला सहभागी होण्याचे आवाहन…
सावंतवाडी,ता.२७: ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत मुस्लिम समाजाच्या माध्यमातून काढण्यात येणारी “शांतता फेरी” एक दिवस उशिरा म्हणजे २९ तारखेला काढण्यात येणार आहे. उद्या अनंत चतुदर्शी असल्यामुळे मुस्लिम बांधवाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुस्लिम वेल्फेअर सावंतवाडीचे पदाधिकारी अल्ताफ मुल्ला आणि रफिक मेमन यांनी दिली. २९ तारखेला सकाळी ८ वाजता करोल मोहल्ला येथून नेहमी प्रमाणे ही फेरी काढण्यात येणार आहे. याची नोंद बांधवांनी घ्यावी आणि या फेरीत उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.