निरोगी आयुष्य हेच जीवनाची खरी गुरुकिल्ली…

79
2
Google search engine
Google search engine

लखम राजे भोसले; सावंतवाडी जागतिक योगा दिन साजरा…

सावंतवाडी,ता.२०: योगा केल्या मुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते हीच निरोगी जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांनी जागतिक योगा दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. ऑर्बिट योगा स्टुडिओच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे, माजी उपनगराध्यक्ष सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, पतंजलीचे महेश भाट, प्रशिक्षक अमोल सोनावणे, ऑर्बिट योगा स्टुडिओचे संचालक विनिश तावडे, रिया रेडीज, मोहिनी मडगांवकर आदी उपस्थित होते.

ऑर्बिट योगा स्टुडिओ चे मालक विनित तावडे यांनी निरोगी जिवन जगण्यासाठी जे लागते ते ओळखून हा अत्याधुनिक योगा स्टुडिओ सुरु केला.या योगा स्टुडिओ ने अनेकांना निरोगी बनवले. तज्ञ शिक्षक व योग्य मार्गदर्शन यामुळे अल्पावधीतच हा योगा स्टुडिओ नावारुपाला आला, असे गौरवोद्गार युवराज लखम राजे यांनी काढले.

तर श्री. गावडे यांनी शुभेच्छा देताना योग साधना ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. कुठ्या आजारावर कोणती योगा केली पाहिजे. कोणती योगा केल्यास त्रास अधिक वाढु शकतो हे फक्त योगा शिक्षकच सांगू शकतो म्हणून यू ट्यूब वर योगा बघून करने टाळा व ऑर्बिट योगा मधील तज्ञ शिक्षक अमोल सोनावणे यांना गुरु करा, असे आवाहन केले.

यावेळी योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली सर्व यशस्वी योगा विद्यार्थ्यांचे सन्मान ट्राॅफी व मेडल देऊन गौरव करण्यात आला.