Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
मालवण,ता.२८: राज्य शासन कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व सुकळवाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त १ जुलैला सकाळी १०.३० वाजता सुकळवाड येथील श्री ब्राह्मण देव सभागृह येथे कृषी दिन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास उच्चश्रेणी गटविकास अधिकारी आत्मज मोरे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सरपंच युवराज गरुड, उपसरपंच किशोर पेडणेकर, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.