“गणपती बाप्पा मोरया” म्हणत हुसकावले; मोर्लेतील “ती” कविता व व्हिडिओ व्हायरल…
दोडामार्ग,ता.२८: येथील मोर्ले गावात स्थिरावलेल्या हत्तीने आज तेथील ग्रामस्थ नामदेव सुतार यांच्या थेट अंगणातच हजेरी लावली. यावेळी महाकाय हत्ती दारात पाहून तेथे असलेल्या शेजाऱ्याने गणपती बाप्पा मोरया, असे म्हणत त्या हत्तीला हुसवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे काही वेळाने हत्ती ही ठिकाणावरून निघून गेला याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही घटना आज रात्री ८ वाजता घडली. दरम्यान घडलेल्या घटनेबाबत प्रशासनाला जागे करण्यासाठी हत्ती इलो आमच्या खळ्यात, फॅमिली राहिली घरात बाकीची मंडळी राहिली. रस्त्यात हत्ती सातच्या आत घरात यवा कोकण आणि मोर्ले गाव आपलोच, असा अशा आशयाची कविता पाठवून सुतार यांनी वनविभाग आणि प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. गेले काही दिवस दोडामार्ग भागात हत्ती धुमाकुळ घालत आहेत. त्यातील दोन हत्तींनी कोलझर परिसरात आपला मोर्चा वळवला आहे तर दोन हत्ती मोर्ले भागात आहेत.