दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॅलेजचा बारावीचा निकाल ९७.२४ टक्के…

9
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग,ता.०८: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलचा निकाल ९७.२४% इतका लागला आहे. यात विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १००%, तर कला शाखेचा निकाल ९२.५९ % इतका लागला आहे. शाखानिहाय प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक कुमारी प्राची प्रमोद शेटवे (87.33%) तालुक्यात प्रथम, अकाउंट विषयात 100 पैकी 100 गुण, व्दितीय क्रमांक – कुमारी साक्षी गणेश पांचाळ (76.67%)

तृतीय क्रमांक- कुमारी साक्षी रामकृष्ण गवस (75.50%)

*विज्ञान शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे*

प्रथम क्रमांक – कुमारी मानविका दशरथ राजगोळकर (80.16%) विज्ञान शाखेतून तालुक्यात प्रथम, व्दितीय क्रमांक- कुमारी खुशबू देवराम भाटी (80.00%) विज्ञान शाखेतून तालुक्यात द्वितीय ,

तृतीय क्रमांक- कुमारी नुपूर अविनाश भुजबळ (79.83% )विज्ञान शाखेतून तालुक्यात तृतीय.

*कला शाखेचा निकाल पुढील प्रमाणे*

प्रथम क्रमांक- मानसी अशोक गवस (73.50 %),

व्दितीय क्रमांक- कुमार विपुलराज विष्णू पारकर (57.00%),

तृतीय क्रमांक- कु. समृद्धी चंद्रकांत गवस (56.83%).

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री विकासभाई सावंत, खजिनदार सी . एल.नाईक साहेब, सचिव व्हि. बी. नाईक सर, मुख्याध्यापक शैलेश नाईक सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.