वैभववाडी तालुक्यात दहावी परीक्षेचा निकाल ९९.४२ टक्के…

5
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.१७: तालुक्याचा माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाल ९९. ४२ टक्के लागला आहे. तालुक्यातून माध्यमिक विदयालय उंबर्डेचा अमेय अजित खाडये ( ९८.८०) टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम आला आहे. तर याच विदयालयाचा श्रेयस श्रीकांत खाडये ( ९६.८०) टक्के गुण मिळवत दुसरा आला आहे. तर करुळ माध्यमिक विदयालयाची प्राची संदीप कोलते ( ९६.२०) टक्के गुण मिळवत तिसरी आली आहे. तालुक्यातून २७२ मुलगे व २४८ मुली असे एकूण ५२० विदयार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ५१७ विदयार्थी पास झाले आहेत.तालुक्यातील एकूण १८ विदयालयापैकी १६ विदयालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

तालुक्यातील विदयालय निहाय निकाल प्रथम तीन क्रमांकासह.

शोभना नारायण माध्यमिक विदयालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ९ विदयार्थी परीक्षेस बसले होते. विदयालयातून प्रथम क्रमांक कुमारी सोमेश्वरी धनाजी भोसले ( ९१ ) टक्के, द्वितीय क्रमांक सानिका दिपक पवार ( ८८.४०), तृतीय क्रमांक श्रृती संतोष साळवी( ८७.६०)

माधवराव पवार माध्यमिक विदयालय कोकिसरेचा निकाल ९८.८२ टक्के लागला असून ८५ विद्यार्थी पैकी ८४ विदयार्थी परीक्षेस बसले होते. विदयालयातून प्रथम सुरज रमेश मुळये ( ९५.६०) , किर्ती राजन साळुंखे ( ९५.२०), नाजुका जितेंद्र सावंत ( ९४.२०)

अभिनव विदया मंदिर सोनाळी इग्लिश मिडियम १०० टक्के निकाल लागला आहे. १९ विदयार्थी परीक्षेस बसले होते. विदयालयातून प्रथम क्रमांक मिनल प्रमोद पांचाळ ( ९४.८०), द्वितीय क्रमांक ईशा रामचंद्र नारकर( ९३.२०), तृतीय क्रमांक तेजस रविंद्र मोरे ( ९१.८०)

मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विदयालय मांगवलीचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३२ विदयार्थी परीक्षेस बसले होते. विदयालयातून प्रथम क्रमांक सानिका सत्यवान दळवी ( ९५.६०), द्वितीय क्रमांक हर्ष सुरेश सुतार ( ९३.८०), शुभम दिलीप परब ( ९१.६०).

न्यु इग्लिश स्कूल हेतचा निकाल १०० टक्के लागला आहे. विदयालयातून प्रथम क्रमांक भक्ती व्यंकटेश जामदार ( ९०.६०)व गौरी अमर महाडीक ( ९०.६०), द्वितीय क्रमांक ऋतूजा एकनाथ चौगुले ( ८९.८०), तृतीय क्रमांक दिक्षा दिपक फोंडके ( ८८.८०)

कुर्ली माध्यमिक विदयालय कुर्लीचा निकाल १०० टक्के लागला आहे. विदयालयातून प्रथम क्रमांक संगिता राजू हुंबे ( ८२.२०), द्वितीय क्रमांक सरीता विजय पाटील ( ८२), तृतीय क्रमांक सुजल सुरेश हुंबे ( ७९.२०).

आदर्श विदया मंदिर भुईबावडा १०० टक्के निकाल .विदयालयातून प्रथम क्रमांक मंथन शरद मोरे ( ८३.४०), द्वितीय क्रमांक शुभम संतोष भुतार्णे, तृतीय क्रमांक अलोक संजय नारकर ( ८०.६०)

अरविंद सावंत सरदार माध्यमिक विदयालय नाधवडेचा १०० टक्के निकाल लागला आहे. विदयालयातून प्रथम क्रमांक गौरव किशोर कुडतडकर ( ९४.८०), द्वितीय क्रमांक पराग प्रल्हाद कुडतडकर ( ९४.६०), श्रध्दा सुधीर भरडे ( ९३.२०)

यशवंतराव चव्हाण विदयालय आचिर्णे १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ३८.विदयार्थी परीक्षेस बसले होते. विदयालयातून प्रथम क्रमांक विभा रुपेश रावराणे ( ९१), द्वितीय क्रमांक प्राजक्ता प्रकाश शिंगाडे ( ९०.८०), शिवकुमार तुकाराम देवकर ( ९०.२०).

विकास विदयालय सडुरे अरुळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. वियालयातून प्रथम क्रमांक लिना महेंद्र जंगम ( ९०), द्वितीय क्रमांक श्रृती जयदिश रावराणे( ८९.८०) अक्षता सत्यवान रावराणे ( ८५.२०)

माध्यमिक विदयालय करुळ १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ३० विदयार्थी परीक्षेस बसले होते.विदयालयातून प्रथम क्रमांक प्राची संदीप कोलते ( ९६.२०), द्वितीय क्रमांक अक्षता अनिल कदम ( ८९.६०), तृतीय क्रमांक प्रगती राजेंद्र तावडे ( ८५.६०)

अर्जुन रावराणे विदयालय वैभववाडीचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण ५६ विदयार्थी परीक्षेस बसले होते. विदयालयातून प्रथम क्रमांक पौरस मधुकर इंदप( ९४.२० ),द्वितीय क्रमांक तमिष गजानन अडूळकर ( ९२.८०), शिवतेज नविन घोडगे ( ९२.२०).

माध्यमिक विदयालय उंबर्डेचा १०० टक्के निकाल लागला असून एकूण २० विदयार्थी परीक्षेस बसले होते. तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक या विदयालयाच्या विदयार्थ्यांनी पटकवला आहे. तालुक्यात व विदयालयात प्रथम क्रमांक अमेय अजित खाडये (९८.८० ) तर तालुक्यात व विदयालयात द्वितीय क्रमांक श्रेयस श्रीकांत खाडये ( ९६.८०), तृतीय क्रमांक पियुष दिलीप जाधव ( ९५.०४).

माध्यमिक विदयालय लोरे चा १०० टक्के निकाल लागला असून विदयालयातून ३१ विदयार्थी परीक्षेस बसले होते. विदयालयातून प्रथम क्रमांक समर्थ गजानन सावंत ( ९३.६०), द्वितीय क्रमांक वैष्णवी अनिल नराम ( ९२.८०), तृतीय क्रमांक कस्तुरी दिगंबर पानकर ( ९२)

छञपती शिवाजी विदयालय नेर्ले १०० टक्के निकाल लागला आहे.

प्रथम क्रमांक तन्वी प्रदीप इंदूलकर ( ९१.६०), द्वितीय क्रमांक निकीता प्रमोद बोलये ( ९०.६०) व तन्वी संजय गुरव ( ९०.६०) तृतीय क्रमांक दिसव्या सुभाष गावडे (.९०.४०).

कोळपे ऊर्दू माध्यमिक विदयालय ९७. टक्के निकाल लागला आहे. विदयालयातून प्रथम क्रमांक नुरुनैसा ताया चोचे ( ९१), द्वितीय क्रमांक मिसबा मेहरली रमदूल ( ८८.२०)तृतीय क्रमांक आरजू दिलदार तिवले ( ८७)

स्वामी विवेकानंद हायस्कूल तिथवली १०० टक्के निकाल लागला असून १६ विदयार्थी परीक्षेस बसले होते. प्रथम क्रमांक सानिका सलीम काझी( ९०.७७) द्वितीय क्रमांक सानिया नाईक ८७.०४)

तृतीय क्रमांक तेजस्वी शिवराम हरयाण (८४.०४)

नवभारत हायस्कूल कुसूर १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण २३ विदयार्थी परीक्षेस बसले होते.विदयालयातून प्रथम क्रमांक मानव रविकांत पवार (८२.८०)द्वितीय क्रमांक सानिका रविंद्र साबळे ( ८२), अंकीत अनंत सावंत ( ८०.४०)