शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक…

7
2
Google search engine
Google search engine

१७ तासांच्या चौकशीनंतर कारवाई; पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहाराचा ठपका…

मुंबई ता. ०१
पत्राचाळ प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली.तब्बल १७ तासाच्या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.त्यासाठी दिल्लीवरून खास ईडीचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते तत्पूर्वी नऊ तास राऊत यांच्या घरात चौकशी करण्यात आली. यावेळी ११ लाखाची रक्कम त्या ठीकाणी मिळाली.त्यानंतर आठ तास ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. दरम्यान ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर आपल्याला अटक करण्यात येणार आहे आणि आपण अटक करून घेणार आहे. काही झाले तरी आपण घाबरणार नाही शिवसेना सोडणार नाही असे श्री राऊत यांनी म्हटले होते . परंतु त्यांना रात्री उशिरा अटक केल्याचे ईडी कडुन अखेर जाहीर करण्यात आले.