जे-जे माझ्या विरोधात बोलले त्यांना पराभवाची धुळ चाखावी लागली…

4
2
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर; सावंतवाडीकर माझ्या बाजूने, कोण आले अन् गेले फरक पडत नाही…

सावंतवाडी,ता.०१: ज्यांनी-ज्यांनी सावंतवाडीत येऊन माझ्या विरोधात वक्तव्य केले त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. सावंतवाडीकर माझ्या बाजूने आहे. त्यामुळे ते नक्कीच माझ्यावर झालेल्या टिकेला उत्तर देतील,असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते तथा बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिले. एका राऊतांना अटक झाली, आता दुसरे राऊत मैदानात उतरले आहेत. ते त्यांच्यापेक्षा शिवसेनेची हानी करतील,असाही टोला त्यांनी लगावला. श्री.
केसरकर यांनी आज येथे आदित्य ठाकरे यांची सभा झाल्यानंतर सायंकाळी उशिरा पत्रकारांशी झूम ॲपच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, माझ्या बाजूने सावंतवाडीची जनता आहे. त्यामुळे कोण आले, कोण गेले याचा मला फरक पडत नाही. मी सद्यस्थितीत शिंदे गटाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे मला बाजू मांडण्यासाठी राज्य व देशस्तरावर बोलावे लागते. त्यामुळे तूर्तास मला वेळ नाही. सावंतवाडीत आल्यानंतर मी झालेल्या टीकेले सविस्तर उत्तर देईन. सावंतवाडीकरांसाठी मी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, याचे मला दुःख आहे. कोणी नाराज होऊ नये.