मालवणात सेवांगणच्या वतीने २६ ऑगस्ट रोजी मोदक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…

7
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २१ : येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने श्री गणरायाच्या स्वागतासाठी २६ ऑगस्ट रोजी सेवांगण येथे मोदक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात उकडीचे मोदक, सारण, चॉकलेट मोदक, चॉकलेट मिक्स मोदक, मँगो मोदक, रोझ गुलकंद मोदक, पान मोदक, पिनट मोदक, रोझ संदेश मोदक, काजू मोदक, मावा मोदक, टुटीफ्रुटी मोदक हे सर्व प्रकार शिकवले जाणार आहेत.
हे प्रशिक्षण शिबीर २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत होणार आहे. यासाठी ३०० रुपये प्रशिक्षण शुल्क ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दुपारचे जेवण सेवांगणच्या वतीने दिले जाणार आहे. प्रशिक्षण शिबिरात प्रवेश मर्यादित आहे. इच्छुकांनी आपली नावे २४ ऑगस्ट पर्यंत नोंदवावीत. अधिक माहितीसाठी सेवांगण कार्यालय ०२३६५-२५२२५०, ९४२३९४६००३, ९४२१५६९७०४ येथे संपर्क साधावा असे आवाहन सेवांगण चे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.