सावंतवाडी अर्बन बँकेचे वैभव टिकलं पाहिजे…

14
2
Google search engine
Google search engine
  1. दीपक केसरकर; सर्वांनी एकत्र येऊन आणखी बळकटी देऊया…

सावंतवाडी,ता.२१: शहराच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सावंतवाडीत अर्बन बँकेचे वैभव टिकलं पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न करा, त्यासाठी आवश्यक असलेली मदत मी नक्कीच करेन, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला. केवळ बँकेचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, संचालक आणि मुख्य करून सदस्यांनी बँकेवर विश्वास ठेवल्यामुळे बँक अडचणीच्या काळात सुद्धा उभारी घेऊ शकली. भविष्यात सर्वांनी एकत्र प्रयत्न येवून त्याला आणखीनच बळकटी देवूया, असे आवाहन केसरकर यांनी केले.

सावंतवाडी अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज येथे संपन्न झाली. यावेळी माजी अध्यक्ष आणि संचालक तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बैठकीच्या अध्यक्ष स्थानी बँकेचे अध्यक्ष अँड सुभाष पणदूरकर, उपाध्यक्ष रमेश बोंद्रे, गोविंद बाळा वाडकर, अशोक दळवी, रमेश पई, सौ. मृणालिनी कशाळीकर, राजेश पनवेलकर, सुरेश बोवलेकर, उमाकांत वारंग, नरेंद्र देशपांडे, यल्लाप्पा परशुराम, सौ. अपर्णा कोठावळे, सुधीर नाईक, मुख्य कार्यकारी पास्ते आदी उपस्थित होते