सावंतवाडीत होणारे सोमवारचे “घंटानाद” आंदोलन स्थगित…

3
2
Google search engine
Google search engine

बबन साळगावकर; देवीच्या कौलानंतर पुढील भूमिका, मानकऱ्यांचे म्हणणे…

सावंतवाडी,ता.२७: सोनुर्ली येथील माऊली मंदिरात झालेल्या चोरीच्या तपासासाठी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सोमवार २९ ऑगस्टला पुकारलेले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. माऊली देवीच्या कौलानंतर पुढील भूमिका घेण्यात येईल, अशी भूमिका देवस्थानचे मुख्य मानकरी राजेंद्र गावकर व अन्य मानकऱ्यांनी घेतल्यामुळे सोमवारी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असे श्री. साळगावकर यांनी सांगितले.