किंगकोब्रा बाळगल्या प्रकरणी दोडामार्गात तथाकथित सर्पमित्राला अटक…

8
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी वनविभागाची कारवाई; चौकशी दरम्यान संशयिताची उडवाउडवीची उत्तरे…

दोडामार्ग,ता.०६: दुर्मिळ प्रजातीचा किंग कोब्रा साप अवैधरीत्या बाळगल्या प्रकरणी एका तरुणावर वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल विजय निरलगी (रा. दोडामार्ग) असे या तथाकथित सर्पमित्राचे नाव आहे. त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी मदन क्षीरसागर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, निरलगी हा गेले दोन-तीन दिवस पाळीये येथे दिसून येणाऱ्या किंगकोब्रा सापाच्या पाळतीवर होता. सदर किंगकोब्रा सापाला पकडण्यापूर्वी वनविभागाला पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे. हे माहिती असूनदेखील त्याने दोडामार्ग येथील स्थानिक वन अधिकारी-कर्मचारी यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता तो साप अवैद्यरित्या पकडून ताब्यात ठेवला. दोडामार्ग वनपरिक्षेत्र कार्यलयाला सायंकाळी याची गुप्त माहिती मिळताच सदर तरुणाची व त्याच्या ताब्यात असलेल्या किंगकोब्रा सापाचा शोध सुरू झाला. यावेळी संशयित नीरलगी याचेशी वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फोन वर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. परंतु रिंग होऊन देखील त्याने कोणाचाही फोन उचलला नाही किंवा दुर्मिळ किंगकोब्रा वन विभागाच्या ताब्यात दिलेला नाही. आज सकाळी त्याला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यलयात चौकशीसाठी बोलावून घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून देण्यात आलेली उडवाउडवीची उत्तरे व सदर गुन्ह्यात फोटो-व्हिडीओ काढण्यासाठी वापरलेला मोबाईल फोन त्याने लंपास केला असल्याचे निदर्शनास आले. सदर किंगकोब्रा सापाला अवैद्यरित्या बाळगून त्याचे पुरावे नष्ट केल्यामुळे सायंकाळी त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 च्या तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.