किंग कोब्रा बाळगणा-या “त्या” युवकाला दोन दिवसाची वनकोठडी…

11
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग,ता.०७: “किंग कोब्रा” बाळगल्या प्रकरणी काल येथील वनविभागाने ताब्यात घेतलेल्या राहुल विजय निरलगी (रा.दोडामार्ग) याला आज येथील न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान त्याला अटक करण्यात आली तरी अद्याप पर्यंत त्याने आपला मोबाईल कोठे लपवला ? त्या कोब्राला कोठे सोडले ? हे सांगितलेले नाही. तर तपास कामात सुध्दा “तो” सहकार्य करत नाही, असे वन अधिकारी मदन क्षिरसागर यांचे म्हणणे आहे.
पाळये- दोडामार्ग येथे राहुल याने किंग कोब्रा हा विषारी जातीचा साप पकडला होता. या प्रकाराची माहिती अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आल्यानंतर वनविभागाने राहुल याला सहकार्य करण्याची विनंती केली होती. मात्र उलट उडवा-उडवीची उत्तरे देत त्याने “त्या” सापा सोबत छायाचित्रण करणे तसेच खेळणे असे प्रकार केले होते. त्यानंतर आपण तो साप नैसर्गिक अधिवासात सोडला, असे सांगितले. त्या संदर्भात वन अधिकाऱ्यांनी पुरावे मागितले असता आपल्या मोबाईलमध्ये तसा व्हिडिओ आपण काढला होता. परंतु आता माझा मोबाईल हरवला आहे, असे त्यांनी सांगितले. यावरून त्याच्यावरील संशय आणखीन बळावला होता. त्यामुळे त्याला काल ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. तर आज येथील न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे.