पाकवादी घोषणा देणार्‍या युवका विरोधात सावंतवाडीत मनसेकडुन निदर्शने…

48
2
Google search engine
Google search engine

कठोर कारवाई करण्याची मागणी; उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन…

सावंतवाडी,ता.२६: पाकवादी घोषणा देणार्‍या पुण्यातील “त्या” युवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आज मनसेच्या पदाधिकार्‍यांनी पोलिसांकडे केली. यावेळी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या प्रसंगी ज्यांना आपल्या देशाबद्दल प्रेम नसेल त्यांना येथून हाकलून द्या किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. झालेला प्रकार हा देशासाठी योग्य नाही, त्यामुळे देशविघातक भूमिका घेणाऱ्या विरोधात कठोर भूमिका घ्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या कार्यालयाबाहेर ही निर्दशने करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उपजिल्हा अध्यक्ष दया मेस्त्री, संतोष भैरवकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे ,मंदार नाईक ,कुणाल किनळेकर ,बाबल गावडे ,दिपक गावडे,  उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, कौस्तुभ नाईक ,सुरेंद्र कोठावळे ,प्रवीण गवस ,आबा चीपकर ,मनोज कांबळी, विष्णू वस्कर, वैभव धुरी, मंदार सुभेदार आदी उपस्थित होते.