बापर्डे गावातील लोकसभा हाच स्वच्छतेचा केंद्रबिंदू…

18
2
Google search engine
Google search engine

चंद्रकांत मोरे; गावातील उपक्रमाला अव्वर सचिवांची भेट…

देवगड,ता.१९: बापर्डे गावाचे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राजस्तरीय समितीने नुकतीच तपासणी करत मुल्यमापन केले. यावेळी राज्यस्तरीय समितीतील पाणी व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबईचे अव्वर सचिव चंद्रकांत मोरे यांनी नाविन्यपुर्ण स्वच्छतेबाबतचे उपक्रमांना भेट देत कौतुक केले .
यावेळी मार्गदर्शन करताना अव्वर सचिव चंद्रकांत मोरे म्हणाले की, बापर्डे गावातील लोकसहभाग हाच स्वच्छतेचा केंद्रबिंदू असुन स्वच्छतेबाबत राबवलेले नाविन्य उपक्रम तसेच शाश्वत विकास कौतुकास्पद असुन भजनाच्या माध्यमातुन स्वच्छतेबाबत केलेले जनजागृती महत्वाची आहे. याबाबत भजनी बुवा संदीप नाईकधुरे व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करत बापर्डे गावचे सरपंच संजय लाड व ग्रामसेवक शिवराज राठोड यांनी सर्वाना एकत्रित आणत केलेले हे स्वच्छतेचे काम गावाला उंच शिखरावर नेईल, असे मत अव्वर सचिव चंद्रकांत मोरे यांनी मांडले.
यावेळी व्यासपिठापर कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे, सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे, उपमुख्यकार्यकारी विनायक ठाकुर, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण, बापर्डे सरपंच संजय लाड, उपसरपंच देवळेकर, ग्रामसेवक शिवराज राठोड, माजी सरपंच श्रीकांत नाईकधुरे, माजी जि. प. उपाध्यक्ष विठ्ठल राव नाईकधुरे, चेअरमन अजित राणे, जीवन नाईकधुरे, भजनी बुवा संदीप नाईकधुरे , विस्तार अधिकारी अंकुश जंगले, पाणी व स्वच्छता विभागाचे संतोष पाटील, प्रविण काणकेकर, मनिष पडते, तोरस्कर, कृषि अधिकारी दिगंबर खराडे, ग्रा. प. सदस्य गुणवंत राणे, सुर्यकांत येझरकर, सीमा नाईकधुरे, रेवती मोंडकर प्रियांका राणे, सुविधा दुसनकर, विवेक वेद्रुक, जेष्ठराम वेदरुख, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नाईकधुरे, परशुराम वेद्रुक, सुशील तिरलोटकर, प्रकाश घाडी, अशोक घाडी, विलास गुरव आणि पोलीस पाटील नितीन नाईकधुरे व तलाठी वळजू आणि असरोडकर आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या कार्यक्रमात स्वच्छतेत विशेष योगदान व विशेष कामगिरी केलेले बापर्डेतील स्वच्छता दुतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यामध्ये स्वच्छता कर्मचारी उमेश सकपाळ, भजनी बुवा संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे , माजी जिं .प सदस्या अनघा राणे, रूपेश मोंडकर, बचतगट प्रतिनिधी वृक्षाली नाईकधुरे, अनाजीशेठ नाईकधुरे, आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. चित्रा पाटील, जलसुरक्षक प्रशांत देवळेकर आदींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यस्तरीय समितीकडून बापर्डे गावातील स्वच्छतेबाबत राबवलेले उपक्रम तसेच गृहभेटी, शोष खड्डे, बायोगॅस, सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, नळयोजना, लोकसहभागातुन केलेली स्वच्छतेबाबतची कामे यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली तसेच संपुर्ण दफ्तरची तपासणी केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तांबे यांनी केल तर प्रास्ताविक शिवराज राठोड यांनी तर आभार सरपंच संजय लाड यांनी मानले.