दिवाळी निमित्त उमेद अंतर्ग तबचतगट उत्पादित मालाच्या विक्री प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद…

6
2
Google search engine
Google search engine

ओरोस ता. ०१: दिवाळी उत्सवानिमित्त उमेद अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर पाच दिवस भरविण्यात आलेल्या बचतगट उत्पादित मालाच्या विक्री प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात जिल्ह्यातील सहा महिला बचतगट समुहानी सहभाग घेतला होता. ७७ हजार ४७० रुपयांची एकूण विक्री या कालावधीत झाली आहे.
उमेद – राष्ट्रिय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील बचतगटांनी उत्पादित केलेल्या दिवाळी फराळाला बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी याचा शुभारंभ केला होता. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार आदी उपस्थित होते.