“हे चांदणे फुलांनी” मैफिलीला सावंतवाडीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

7
2
Google search engine
Google search engine

सलग पाचव्या वर्षी आयोजन; स्वरांनी सजली त्रिपुरारीची सायंकाळ…

सावंतवाडी,ता.०९: जिल्ह्यातील कला व सांस्कृतिक चळवळीमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित “हे चांदणे फुलांनी” या संगीत मैफिलीला सावंतवाडीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीपक केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या सहकार्यातून सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम घेण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुन्या-नव्या हिंदी व मराठी गीतांच्या सदाबहार सादरीकरणा सोबतच नृत्याविष्काराने या मैफिलीत उपस्थित रसिकांची मने जिंकली.

सोमवारी जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे ही मैफील रंगली, सद्गुरु संगीत विद्यालयाच्या वर्षा देवण, अँड. सिद्धी परब, समृद्धी सावंत, मधुरा खानोलकर, केतकी सावंत, गौरांगी सावंत, अनामिका मेस्त्री, पूजा दळवी, नितिन धामापूरकर, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ, मानसी वझे,अंकुश आजगांवकर, स्मिता गावडे, प्रगती मिशाळ, चिन्मयी मेस्त्री, श्रीया म्हालटकर, तन्वी दळवी, वैष्णवी गावडे, लतिका नाईक, वैष्णवी वाडकर आदी कलाकारांच्या एकापेक्षा एक सरस गीतांनी सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले. तर वैष्णवी गावडे व कलानिकेतन सांस्कृतिक कला मंडळ,शाखा सावंतवाडी व बांदा च्या जिया कळंगूटकर, वैदेही बांदेकर, निधी सावंत, दुर्वा गवस, वेदीका गावडे, मनस्वी हरमलकर, सिद्धाली राऊळ, प्राजक्ता कळंगूटकर, शेफाली केसरकर यांच्या नृत्यामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली.

या कार्यक्रमाला साथसंगत श्री निलेश मेस्त्री, कू मंगेश मेस्त्री (हार्मोनियम) , श्री किशोर सावंत व कु निरज मिलिंद भोसले(तबला) , कु शुभम सुतार (ढोलक/ढोलकी) , श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), श्री बाळकृष्ण मेस्त (सिंथेसायझर) यांची लाभली. ध्वनीव्यवस्था सुभाष शिरोडकर यांनी सांभाळली व श्री संजय कात्रे, सौ.‌उमा तिळवे यांचे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

याप्रसंगी ऋतू हिरवा, कशी करू स्वागता, मन तळ्यात मळ्यात, केसरिया बालमा, छत आकाशाचे, चंदाराणी, चार होत्या पक्षिणी त्या, मलमली तारुण्य माझे, पाहिले न मी तुला, नभ उतरू आलं, झुंजुर मुंजूर, हृदयी वसंत फुलताना, तोच चंद्रमा नभात, प्यार हुआ चुपकेसे,एवढे तरी करून जा, आला आला वारा, कुहू कुहू बोले, धुंदीत राहू,

स्वर्ग हा नवा, लल्लाटी भंडार, आदि एकापेक्षा एक सरस गीत सादर करण्यात आली, झाला साक्षात्कार या भैरवीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील राऊळ, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, नादब्रह्म सावंतवाडीचे अध्यक्ष प्रदीप शेवडे आबा केसरकर, नंदू शिरोडकर, भारती मोरे, पुंडलिक दळवी, सुधीर आडिवरेकर, अभिमन्यू लोंढे, भाऊ साळगावकर, भाई देऊलकर, दादा मडकईकर, वैभव केंकरे,विनोद गांवकर,संदीप गवस, दिनकर परब, हेमंत खानोलकर, सोमा सावंत,तानाजी सावंत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर सुधीर आडीवरेकर, महादेव गावडे, राघव नाईक, अर्चना नाईक, गजानन वेंगुर्लेकर, राजन हावळ, गोविंद मळगावकर, समर्थ केळुसकर, अखिलेश कानसे यांचे विशेष सहकार्य लाभले.