पदाधिकाऱ्यांत ताळमेळ नसल्‍याने चांगले लोक पक्षात येत नाहीत…

6
2
Google search engine
Google search engine

बाळा नांदगावकर यांची खंत; पक्षसंघटनेबाबत कार्यकर्त्यांमध्ये अनास्था…

कणकवली, ता.०२ : मनसेच्या सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांमध्ये ताळमेळ नसल्‍याची बाब पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या लक्षात आलेली आहे. पदाधिकाऱ्यांतील गोंधळामुळे पक्षात चांगली लोकं येत नाहीत. त्‍यामुळे सध्याची कार्यकारीणी बरखास्तीची वेळ आली अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्‍यानंतर श्री.नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, मनसेच्या जिल्‍हा पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ असल्‍याने कणकवलीतील बैठकीला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी येण्यास नकार दिला. कार्यकर्त्यांची अशी अनास्था असेल तर राज ठाकरे यांनी का यावं? असं म्‍हणत श्री.नांदगावकर यांनी पक्षाबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेल्‍या अनास्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मेळ दिसत नाही. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा योग्य निर्णय पक्ष अध्यक्ष दोन दिवसात घेतील, असेही श्री नांदगावकर यांनी सांगितले.
मनसेच्या कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्याची बैठक मराठा मंडळ हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला येण्यास श्री ठाकरे यांनी नकार दिला. त्यानंतर बाळा नांदगावकर यांच्यासहित मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, माजी आमदार परशुराम उपरकर व इतर नेते उपस्थित होते.
मराठा मंडळ हॉलमध्ये आल्यानंतर श्री. नांदगावकर यांनी तीन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न केला. कार्यकर्त्यांमधील जर उत्साह असा असेल तर राज ठाकरे यांनी बैठकीला का यावे, असा सवाल त्यांनी केला. फक्त फोटो काढण्यासाठी येथे यायचं का? अशातून संघटना कशी वाढेल? याबाबत त्यांनी कानपिचक्या दिल्या.