ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांची रंगीत तालीम…  

21
2
Google search engine
Google search engine

“दंगा काबू” पथक अलर्ट; पोलीस निरीक्षकांनी कर्मचाऱ्यांना दिली प्रात्यक्षिके…

सावंतवाडी,ता.०३: ग्रामपंचायत निवडणुका आणि महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलिसांनी दंगा काबू मोहिमे अंतर्गत रंगीत तालीम केली. येथील पोलीस ठाण्याच्या आवारात हा उपक्रम घेण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत प्रात्यक्षिके दिली.

यावेळी पोलीस सतीश कविटकर, संभाजी देसाई, रामचंद्र साटेलकर, महेश जाधव, अमित राऊळ, मनोज राऊत आदींसह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.