दारू वाहतूक प्रकरणी पत्रादेवी येथे एक ताब्यात…

4
2
Google search engine
Google search engine

एक्साईजची कारवाई; अंधाराचा फायदा घेऊन ट्रक चालकाचे पलायन…

बांदा,ता.०७: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पत्रादेवी येथील राज्य उत्पादन शुल्कच्या नाक्यावर तब्बल ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उस्मानाबाद येथील ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. समीर सरदार शेख (वय ३३) असे त्याचे नाव आहे. तर दुसरा ट्रकचालक काळोखाचा फायदा घेऊन पसार झाला. खुर्च्यां व अन्य साहित्य ठेवून त्याच्या खाली दारू लपून ठेवण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या ट्रकला (एमएच १८ बीजी १३३६) तपासणीसाठी थांबविण्यात आले. त्यावेळी ट्रकच्या पाठीमागील हौद्याची तपासणी केली असता आतमध्ये वेस्टेज मटेरियल भरण्यात आले होते. अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी मटेरियल उतरविण्यास सुरुवात केले. यावेळी काळोखाचा फायदा घेत चालकाने तेथून पलायन केले. अबकारी खात्याच्या पथकाने गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे एकूण ७३६ खोके जप्त केलेत. तसेच एकूण १९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरी कारवाई आज सकाळी ९.३० वाजता करण्यात आली. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ०७ एस ०३१३) तपासणीसाठी थांबविण्यात आले. ट्रकच्या मागील हौद्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक खुर्च्या भरण्यात आल्या होत्या. खुर्च्याच्या मागे दडवून ठेवलेल्या गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे तब्बल ४०० खोके जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण २१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत ट्रक चालक समीर सरदार शेख (वय ३३, रा. उस्मानाबाद) याचेवर अटकेची कारवाई करण्यात आली.
दोन्ही कारवाया अबकारी निरीक्षक कमलेश माजिक, विभूती शेट्ये, उपनिरीक्षक जयेश बांदेकर, कर्मचारी विशाल गवस, सुनील कालबोटकर, दशरथ तारी, लाडू गावकर, जानू झोरे यांच्या पथकाने केली.