टोलमुक्‍तीसाठी सर्व सिंधुदुर्गवासीयांनी एकत्र यावे…

11
2
Google search engine
Google search engine

संदेश पारकर; ओसरगाव येथे टोलमुक्‍तीसाठी राजकीय पदाधिकारी, व्यापारी संघ पदाधिकाऱ्यांनी बैठक…

कणकवली, ता.२२ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्‍या ओसरगाव येथील टोल नाक्‍यात सर्वजण भरडले जाणार आहेत. त्‍यामुळे सिंधुदुर्गातील सर्ववाहनांना टोलमाफी मिळायलाच हवी. त्‍यासाठी सर्व सिंधुदुर्गवासीयांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरण्याची आवश्‍यक आहे. टोलमुक्‍तीच्या लढ्यात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरेल अशी ग्‍वाही शिवसेना नेते संदेश पारकर यांनी आज दिली.

सिंधुदुर्ग टोलमुक्त कृती समितीच्यावतीने ओसरगाव टोल नाक्याच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये राजकीय पदाधिकारी आणि व्यापारी संघटना पदाधिकारी यांची बैठक झाली. यात श्री.पारकर यांनी मार्गदर्शन केले. त्‍यांच्यासोबत टोलमुक्त कृती समितीचे अध्यक्ष सतीश ललित नंदन वेंगुर्लेकर ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते

संदेश पारकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी मिळालीच पाहिजे अशी भूमिका शिवसेनेची आहे सिंधुदुर्ग टोलमुक्ती कृती समितीने टोलमुक्त सिंधुदुर्ग व्हावा यासाठी पाऊस उचललं असून त्याला सुद्धा माझा शिवसेनेचा संपूर्ण आपल्याला पाठींबा आहे संपूर्ण जिल्ह्यातील सर्वांनीच एकत्र येऊन जर आपण हा लढा दिला तर या टोल मुक्तीला यश येऊ शकतो या जिल्ह्यामध्ये झाराप ते खारेपाटण असा ७० किलोमीटर काम झालं यामध्येच टोल उभा केलेला आहे जसा ओसरगावला त्रासदायक आहे तसा कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण या तालुक्यांतील नागरिकांना सातत्याने ओरोस मुख्यालयाच्या ठिकाणी जावे लागणार आहे आणि याचाच भुर्दंड वाहन चालकांना सहन करावा लागणार आहे राजकीय पुढाऱ्यांना कोणताही त्रास होणार नसून तर सामान्य माणूस यामध्ये भरडला जाणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील एम एच झिरो सेवन च्या गाड्यांना टोल माफी मिळावी अन्यथा आम्ही टोल सुरू होऊ देणार नाही

ज्यावेळी हा टोल सुरू होईल त्याचवेळी जिल्ह्यातील सामान्य माणसांना झळ बसेल त्यावेळी कळणार आहे त्यामुळे ह्या लढ्यात जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनी उतरणे गरजेचे आहे जिल्ह्यातील सर्वांनी जर एक जुड दाखवली तरच हा लढा यशस्वी होऊ शकतो पोलिसांच्या केसेस विचार करत बसलो तर हा लढा यशस्वी होणार नाही मिया टोलच्या ठिकाणी जवळपास सहा वेळा मी आंदोलन केलं आहे माझ्यावरी सुद्धा केसेस दाखल झाले आहेत मागच्या सहा महिन्यापूर्वी ह्या टोल नाक्यावरून टोल वसुली सुरू होणार होती त्याला मात्र आतापर्यंत स्थगिती मिळाली आहे संबंधित कंपनीचे आतापर्यंत जवळपास १२ कोटीचे नुकसान झाले आहे त्यामुळे आपला विजय आहे तसेच त्यांची देखील टोल वसुली करण्याची हिंमत झाली नाही