आंगणेवाडी जत्रोत्सवात भाजप “आनंदोत्सव” साजरा करणार…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राजन तेली; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह भाजप नेते उपस्थित राहणार…

मालवण,ता.२९:आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा भाजप मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आनंद उत्सव साजरा करणार आहे अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली

भाजपच्या आनंद मेळाव्याची माहिती देण्यासाठी आंगणेवाडी – भोगलेवाडी तीठा येथे सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी खासदार डॉ. निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश बागवे, गणेश आंगणे आदी उपस्थित होते. हा आनंद मिळावा ४ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर चार ते सात या वेळेत घेण्याचे नियोजन असून जिल्ह्यातील जनतेने आंगणेवाडी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेऊन सहभागी होण्याचे आवाहन श्री. तेली यांनी केले.

ते म्हणाले, यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे उद्योग मंत्री नारायण राणे, तसेच आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, नितेश राणे यांच्यासह अनेक नेते, मंत्री आंगणेवाडी येथे येत आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजना,  उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून २०० कोटी रुपयांचे ट्रेनिंग सेंटर जिल्ह्यात होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून योजना थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने भाजपचे आभार व्यक्त करावे यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव देवीच्या साक्षीने करताना भाविकांना किंवा यात्रा परिसरात कोणाला त्रास होणार नाही यासाठी कार्यकर्ते काळजी घेणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने आंगणेवाडी परिसरातील नऊ रस्ते पूर्ण होत आहेत. वीज वितरणची लाईन सुद्धा अंडरग्राउंड करण्यात आली आहे. तसेच मोबाईल व्हॅन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यात्रा परिसरामध्ये दोन ठिकाणी ५० टॉयलेट आणि एसटी स्टँडच्या ठिकाणी प्रत्येकी १०-१० अशी ७० टॉयलेट यावेळी यात्रा परिसरात असणार आहेत. कुठलीही निवडणूक पुढे नसताना हा भाजपचा आनंद मेळावा होत आहे. यावेळी पाचशे माणसे एकाच वेळी स्टेजवर असतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे.  सिवर्ल्ड, नाणार प्रकल्प, आडाळी एमआयडीसी या प्रकल्पाना चालना मिळणे आवश्यक आहे. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावे यासाठी मागणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आई भराडीचे दर्शन घेण्यासाठी येत असल्यामुळे त्यांचे सुद्धा स्वागत या ठिकाणी करण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा डोळ्यात भरून ठेवणारा असेल. सर्वांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

\