अनिल भिसे मित्रमंडळाच्या वतीने २२ फेब्रुवारीला चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

13
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१६: क्रिडातपस्वी शिवाजीराव भिसे यांच्या स्मरणार्थ पहिली ते दुसरीच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ फेब्रुवारीला सांयकाळी ४ वाजता येथील शिवउद्यान गार्डनमध्ये घेण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक यांना बक्षीस, प्रमाणपत्र व स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल ताबडतोब जाहीर केला जाईल.
अधिक माहितीसाठी स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी संतोष परब 9146704663 यांच्याशी संपर्क साधावा. २१ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत नाव नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये मुलांनी भाग घ्यावा, असे आवाहन अनिल भिसे मित्रमंडळाचे सदस्य रत्नाकर माळी, बेंजामिन फर्नांडीस, अरुण भिसे, जतीन भिसे, हेमन केसरकर, ॲन्थोनी फर्नांडीस, दिपक गावकर, अनिल कुडाळकर यांनी केले आहे.