सावंतवाडीतील लेखिका उपमा म्हाडेसर यांचे निधन…

15
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१८: येथील बीरोडकर टेंब येथे राहणाऱ्या लेखिका उपमा म्हाडेसर (वय ७६) यांचे काल पहाटे गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. चार दिवसापूर्वी राहत्या घरी त्या भाजल्या होत्या. त्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रूग्णालयात करण्यात आले होते. परंतु प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्याला गोव्यात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून एकाच पैज नाव असून दुसरा कथासंग्रह मन प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या कथा आरती या मासिकांमधून प्रसिद्ध व्हायच्या. तसेच अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांनी कथा लिहिल्या आहेत. तसेच वृत्तपत्रातूनही त्यांच्या कथा प्रसिद्ध व्हायच्या. पैज या कथासंग्रहाचे प्रकाशन राजमाता सत्वशीला देवी भोसले यांच्या हस्ते झाले होते. तर मन या दुसऱ्या कथासंग्रहाचे प्रकाशन राजघरण्यातील राणी शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते गार्डनमध्ये मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. दोन्ही कथासंग्रह महाराष्ट्रात गाजले. या कथासंग्रहाला प्रस्तावना डॉ. जी. ए. बुवांची लाभलेली आहे. त्यांच्या पश्चात संतोष आणि सुजित असे दोन मुलगे, अवंती आणि प्राची सुना आहेत. सलोनी आणि मनस्वी असा परिवार आहे. त्याच्यावर सायंकाळी सात वाजता सावंतवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील मान्यवर उपस्थित होते.