बांदा-पानवळ येथे ३० मार्चला “रामनवमी उत्सव” साजरा होणार…

8
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२४: प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ-बांदा येथे दिनांक ३० मार्चला “रामनवमी उत्सव” साजरा करण्यात येणार आहे.

यादिवशी सकाळी ९ वाजता नित्यपूजन आणि अभिषेक, १० वाजता ह.भ. प. सदाशिव पाटील यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता श्री रामजन्म सोहळा, त्यानंतर महाप्रसाद, दुपारी २ ते ३ वाजता भक्ती संगीत प्रदीप चिटणीस (मुंबई ), दुपारी ३:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प. पू. भक्तराज महाराज भजन मंडळ पर्वरी यांचे भजन, सायंकाळी ५ ते ५ : ३० वाजता श्रीरामरक्षा आवर्तन, श्री राम जप (सामूहिक), सायंकाळी ६ वाजता शेखर पणशीकर यांचा “गीतरामायण ” होणार असून, रात्रौ ८ वाजता स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने भजन होणार आहे. समस्त भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प. पू. दास (रघुवीर) महाराज यांनी केले आहे.