डेगवे येथील बॅडमिंटन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद…

6
2
Google search engine
Google search engine

बांदा ता. २७: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे डेगवे येथे आयोजित करण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत मनीष पंखानिया आणि मेघल कवठणकर यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. तर क्षितिज परब आणि अमोघ आजगावकर उपविजेते ठरले. स्वप्निल सावंत व धनंजय परब तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. तिन्ही संघाना चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, स्पोर्ट्स चेअरमन रोहन कुबडे, दत्तराज चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, साईस्वरूप देसाई, साई सावंत, अक्षय कोकाटे, ओंकार पावसकर, शिवम गावडे, मुईन खान, कौस्तुभ दळवी, कल्याणदास धुरी, अमित धोंगडे, अजिंक्य पावसकर यांच्यासह डेगवे बॅडमिंटन क्लबचे सदस्य उपस्थित होते.

अक्षय मयेकर म्हणाले की, ग्रामीण भागातील खेळाडूंत गुणवत्ता असूनही त्यांना योग्य संधी मिळत नाही. अशा स्पर्धा मधून चांगले खेळाडू तयार व्हावेत व भविष्यात हेच खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसावेत हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन रोटरॅक्ट क्लबच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली. भविष्यात व्यापक स्वरूपात विविध स्पर्धाचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे.