भुईबावडा-रिंगेवाडी येथील वयोवृद्ध महिला बेपत्ता…

11
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.१०: भुईबावडा- रिंगेवाडी येथील भागीरथी महादेव देसाई (वय ८५) ही वयोवृद्ध महिला बेपत्ता झाली आहे. त्यांचा मुलगा रविंद्र महादेव देसाई यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत खबर दिली आहे. रविवार ९ एप्रिलला दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली आहे. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे चौकशी करुनही ती सापडली नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा रविंद्र यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत खबर दिली आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत.