कणकवलीत ७५ फुटी उंच ध्वज स्तंभावर ध्वजारोहण…

14
2
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.०१: येथे तहसील कार्यालयात ७५ फुटी उंच ध्वज स्तंभावर ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी, प्रगतशील महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे आणि जे या विकासाला अडथळा आणतील त्यांच्याशी संघर्ष सुद्धा करण्याची तयारी सर्वांनी दाखवायला हवी असे आवाहन केले.
महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने कणकवली येथे उभारण्यात आलेल्या ७५ फूटी उंच ध्वज स्तंभावर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विधानभवनाचे चित्र असलेल्या आणि गर्जा महाराष्ट्र माझा हे लेखणीबद्ध केलेला विशाल असा फलक आणि या पार्श्वभूमीवर ७५ फुटी ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील स्थापनादिन असल्याने सिंधुदुर्ग वासियांना देखील आमदार नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहण समारंभात कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश काटकर, तहसीलदार आर जे पवार , इतर शासकीय अधिकारी कर्मचारी, पोलीस पथक, कणकवली कॉलेजचे एनसीसी चे पथक, इतर विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.