कोनाळकट्टा पोस्टात १ कोटीचा अपहार केल्या प्रकरणी चौघे निर्दोष…

8
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०२: कोनाळकट्टा येथील पोस्टात तब्बल १ कोटी १० लाख ८२ हजाराचा आर्थिक अपहार केल्या प्रकरणी चौघा जणांची येथील जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
सुरेश वासुदेव बांदेकर, हनुमंत शंकर धुरी दोघे (कोनाळकट्टा-बांदेकरवाडी ता, दोडामार्ग), मानसी निलेश गंगावणे (रा. भटवाडी वेंगुर्ला), रमेश रामराव वाघुलकर (रा.विद्यानगर- परळी, जि. बीड) अशी त्यांची नावे आहेत. या कामी अ‍ॅड. अनिल निरवडेकर, संग्राम देसाई गणेश चव्हाण, अश्पाक शेख यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, १ डिसेंबर २०१५ ला हा अपहार उघड झाला होता. यात कोनाळकट्टा पोस्टात तब्बल १ कोटी १० लाख ८२ हजाराचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी ग्राहकाने तक्रारी केल्या होत्या त्यानंतर हे प्रकरण पुढे आले होते.
याबाबतची तक्रार तत्कालीन पोस्टाचे अधिकारी अर्जुन इंगळे यांनी दिली होती.त्यानुसार या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी त्यांना अटक करून पुढील कार्यवाही करण्यात आली होती. हा खटला येथील जिल्हा न्यायालय सुरू होतात. मात्र सबळ पुरावे अभावी चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.