अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला वीस वर्षे सश्रम कारावास…

18
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०६: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील एका संशयिताला जिल्हा न्यायालाने तब्बल वीस वर्ष सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गायत्री पाटील यांनी केला. तर सरकारी पक्षातर्फे संदिप राणे यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलिस अधिकारी जयराम पाटील, मल्लिकार्जुन ऐहोळी आणि सिध्दी वेंगुर्लेकर आदींनी केला होता. हा गुन्हा शाबीत होवून संबंधित आरोपीस शिक्षा झाल्याने पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सर्व टिमचे कौतुक केले.