सर्वोदय नगर परिसरात सुरू असलेल्या गटाराच्या कामाला विरोध…

20
2
Google search engine
Google search engine

बाळ बोर्डेकरांची सावंतवाडी पालिकेकडे तक्रार;सांडपाणी सोडणार असल्याने नाराजी…

सावंतवाडी ता.१८: येथील सर्वोदय नगर मधील नगरपालिकेच्या जमिनीत एका बिल्डर कडून विनापरवाना गटराचे बांधकाम केले जात आहे. त्यात सांडपाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष घालावे ,अशी मागणी तेथील रहिवासी गणेश उर्फ बाळ बोर्डेकर यांनी सावंतवाडी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्र दिले आहे त्यात असे म्हटले आहे की त्या ठिकाणी काम करत असलेल्या एका खाजगी बिल्डर कडून नगरपालिकेच्या जमिनीत गटार खोदण्याचे काम सुरू आहे. भविष्यात त्या ठिकाणी गटाराचे पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे लक्ष घालावा तशाप्रकारे आपली कायदेशीर तक्रार आहे. आपण याबाबत पालिकेचे अभियंता शिवप्रसाद कुडपकर यांना कल्पना दिली आहे. परंतु याकडे पालिका प्रशासन लक्ष घालावे व योग्य ती कार्यवाही करावी असे त्यांनी म्हटले आहे.